मुलांना पदक मिळतं किंवा विजय प्राप्त होतो. तेव्हा सगळ्यात जास्त आनंद नातेवाईकांना, कुटुंबियांना आजूबाजूच्या रहिवासीयांना होतो. कारण उद्या त्यांची मुलंही यशस्वी मुलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अशीच प्रगती करतील असा विश्वास अनेकांना असतो. अशात एका सुवर्ण पदक मिळवलेल्या मुलीची हृदयद्रावक घटना समोर येत आहे. झारखंडची रहिवासी असलेली विमला मुंडा हीने कराटेसाठी सुवर्ण पदक मिळवून आपल्या संपूर्ण विभागाचं नाव मोठं केलं होतं. पण आता कुटुंबाचं पोट भरण्यासाठी विमला देशी दारू विकण्याचे काम करत आहे.
सरकारी नोकरी मिळाली नाही
२०११ मध्ये राष्ट्रीय खेळातील स्पर्धेत विमलाने मेडल मिळवले होते. पण सरकारकडून अदयाप नोकरीबाबत कोणताही प्रस्ताव आला नसून घर चालवण्यासाठी आता विमला देशी दारू विकत आहे. लॉकडाऊनच्या काळात तिने कराटे शिकवण्याचे क्लासेसेसुरू केले होते. पण कालांतराने बंद करावे लागले. हाती पैसे शिल्लक नसल्याने तांदळापासून तयार झालेली दारू विकण्याची वेळ आली. Video: शिकारीसाठी बिबट्या थेट झाडावर चढला; माकडानं असं डोकं लावून जीव वाचवला
विमलाने वाणिज्य शाखेतून पदवी घेतली असून सध्या रांचीच्या पतरा गोंडा येथे आपल्या आजोबांसह राहत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सारेन यांनी विमलाच्या या स्थितीला गांभिर्याने घेतले असून त्यांनी क्रिडा सचिवांना विमलाला साहाय्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या संबंधी माहिती दिली आहे. क्रिडाक्षेत्रात अतुलनिय कामगिरी केलेल्या अनेक तरूण- तरूणींना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. अशी अनेक उदाहरण तुम्ही याआधीही पाहिली असतील. बाबो! आकाशात एलियन उडताना पाहून सगळ्यांचीच उडाली झोप; अन् मग झालं असं काही....