तिरुवनंतपुरम - मधमाशी म्हटलं की सर्वांनाच ती चावल्यावर काय होईल याची भीती वाटते. कारण ती चावल्यावर खूप त्रास होतो. मात्र तुम्हाला जर कोणी मधमाश्यांचा एक मित्र आहे आणि तो नेहमीच त्यांच्यासोबत असतो असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे. केरळमधील एका तरुणाच्या मधमाश्या बेस्टफ्रेंड आहेत. त्याच्या शरीरावर हजारो मधमाश्या बसतात मात्र त्याला काहीच होत नाही.
नेचर एम एस असं या तरुणाचं नाव आहे. त्याने सर्वात जास्त वेळ आपल्या चेहऱ्यावर मधमाश्या ठेवल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तब्बल 60 हजार मधमाश्या नेचरने आपल्या चेहऱ्यावर 4 तास 10 मिनिटं 5 सेकंद ठेवून अनोखा विक्रम केला आहे. काही महिन्यांपूर्वी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्याचा हा व्हिडीओ शेअर केला होता. मिळलेल्या माहितीनुसार, नेचरला अशा गोष्टीची आवड आहे. नेचर लहानपणापासूनच चेहऱ्यावर मधमाश्या घेतो. यामुळे आतापर्यंत कधीच त्याला कोणताही त्रास झाला नाही. उलट तो त्यांना आपले मित्र मानतो.
नेचरने याचं श्रेय आपल्या वडिलांना दिलं आहे. त्याचे वडील संजय कुमार मधमाश्या पालनाचा व्यवसाय करतात. मधमाश्या या आपल्या सर्वात चांगल्या मित्र असतात. त्यांना घाबरून दूर पळू नये असं त्यांनी नेचरला सांगितलं. तेव्हापासून नेचरने या मधमाश्यांना आपलं मित्र मानलं. त्यांच्यासह तो एखाद्या मित्राप्रमाणेच वागू लागला आणि मधमाश्याही त्याला आपला मित्रच मानू लागल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक भाग झाला असून सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन ट्रेंड येत असतात. विविध गोष्टी या व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. स्टंटचे खतरनाक व्हिडीओ आपण नेहमीच पाहत असतो. मात्र आता एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण डोंगराच्या अगदी टोकाशी उभा राहून बॅक फ्लिप मारताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
'काँग्रेसच्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली, मेंदूला सूज आली', भाजपा खासदाराचा गंभीर आरोप
चहा विक्रेत्याच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी, फ्लाईंग ऑफिसर होऊन नेत्रदीपक भरारी
"चीनी वस्तूंचा वापर करणाऱ्यांचे पाय तोडा, घरांचं नुकसान करा"
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! तब्बल 81 देशांमध्ये दुसरी लाट; WHO ने दिला गंभीर इशारा
मोदी सरकारच्या 'या' योजनेअंतर्गत 1000 रुपये भाड्याने मिळणार घर; जाणून घ्या कोणाला, कसा होणार फायदा