गेल्या अनेक महिन्यांपासून देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे समस्या आणखी वाढल्या आहेत. देशाचा जीडीपी उणे २३.९ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. ही घसरण ऐतिहासिक आहे. एप्रिल ते जून तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची अक्षरश: घसरगुंडी उडाली आहे. जगातील इतर कोणत्याही प्रमुख देशाची अर्थव्यवस्था भारताइतकी घसरलेली नाही. घसरलेल्या अर्थव्यवस्थेवरून विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. काँग्रेसपासून सगळ्याच विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे यासाठी विरोधकांनी मोदी सरकारनं गेल्या लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या #ModiHaiToMumkinHai हॅशटॅगचा वापर केला आहे. अनेकांनी याच हॅशटॅगचा वापर करत ट्विट करून सरकारला लक्ष्य केलं आहे.
जीडीपीची घसरण पाहून नेटिझन्स म्हणतात, #ModiHaiToMumkinHai
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 10:43 AM