नवी दिल्ली - रेल्वेचा प्रवास म्हटलं की आपल्या हक्काचा, आरक्षित तिकीट मिळालं तर काढलं नाही तर निघालो तसेच, अशीच भावना काहींची असते. तर, पेसेंजल, लोकल, मेमू ट्रेनमधून प्रवास करताना, रेल्वेच्या जनरल डब्ब्यातून प्रवास करताना काहीजण तिकीटही काढत नाहीत. तर, आपल्यासोबत असेलल्या सामानाचे तिकीट काढणे तर नवलंच. अनकेदा प्रवासी जड वस्तू किंवा पाळीव प्राणीही ट्रेनमधून विनातिकीट नेत असतात. मात्र, एका महिला प्रवाशाने आपल्यासोबत असलेल्या बकरीचंही तिकीट काढल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
भारतीय रेल्वेच्या एका ट्रेन प्रवासातील जनरल डब्ब्यातून प्रवास करताना महिलेनं स्वत:सोबत बकरीही प्रवासात घेतली होती. बकरीला आपल्या हातात पकडून ही महिला उभ्यानेच प्रवास करत होती. त्याचेवळी, या डब्ब्यात आलेल्या टीटीईने जनरल सीटवर बसलेल्या प्रवाशांकडे तिकीटाची विचारणा केली. त्यानंतर, ट्रेनमध्ये उभे असलेल्या प्रवाशांनाही तिकीट विचारले. त्यावेळी, संबंधित महिलेकडेही तिकीटाची विचारणा केली. यावेळी, महिलेने अतिशय स्मीतहास्य करत आपल्याकडील तिकीट दाखवले. तसेच, मी माझ्यासोबतच्या बकरीचंही तिकीट काढल्याचं सांगितलं.
गरीब महिलेचा तो प्रामाणिकपणआ आणि स्मीतहास्य एका व्हिडिओत कैद झालं असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, तिकीट चेकर महिलेला बकरीचं तिकीट घेतलं नाही का? असा प्रश्न हसत हसत विचारतो. त्यावेळी, महिलेनं होय, बकरीचंही तिकीट घेतल्याचं सांगताच, तिकीट चेकरही आश्चर्याने हसतो. कारण, एका सर्वसाधारण महिलेचा हा प्रामाणिकपणा आणि स्मीतहास्य पाहून टीटीईही निशब्द होतो.
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सकडून बकरी धारक महिलेचं कौतुक होतं आहे. तसेच, या महिलेचं स्मीतहास्य आणि प्रामाणिकपणा सर्वांनाच भावलाय. यांसारख्या सर्वसामान्य माणसांमुळेच देश आहे, देशाचा अभिमान आणि स्वाभीमान आहेत, असे म्हणत नेटीझन्सकडून या महिलेचं कौतुक होतं आहे.