Viral Video: लोकांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांना आपण देवासमान मानतो. कुठलीही परिस्थिती असो, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर नेहमी तत्पर असतात. एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हीही याला चमत्कार म्हणाल. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला डॉक्टर नुकत्याच जन्मलेल्या चिमुकलला तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
हा व्हिडिओ यूपीचे पोलीस अधिकारी सचिन कौशिक यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओसह माहिती दिली आहे. त्यांनी हिलिले की, ''एका मुलीचा जन्म झाला होता, पण अचानक तिचा श्वास थांबला. सुरुवातीला चिमुकलीला ऑक्सिजन देण्यात आला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यानंतर सुमारे 7 मिनिटे आग्र्यातील बालरोगतज्ञ डॉ. सुलेखा चौधरी यांनी 'माउथ टू माऊथ रेस्पिरेशन' देऊन चिमुकलीला आयुष्य दिले."
मिळालेल्या माहितीनुसार, आग्राच्या सीएचसीमध्ये मुलीचा जन्म झाला होता. जन्म झाल्यापासून तिच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नव्हती. तेव्हा डॉक्टर सुरेखा यांनी नवजात बाळाला तोंडावाटे श्वास देणे सुरू केले. सुमारे 7 मिनिटे श्वास दिल्यानंतर नवजात बाळाची हालचाल सुरू झाली. हा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकजण सुरेक्षा यांना सलाम करत आहेत. हा 26 सेकंदाचा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत तो सुमारे 8 लाख वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओला 83 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.