गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये काही व्हिडीओज आणि फोटोज व्हायरल झाले होते. यातून दावा करण्यात आला होती क, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांच्यात काहीतरी बिनसलंय. दोघेही अनेक प्रसंगी नाराज बघायला मिळाले होते. त्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यातून धक्कादायक दावा करण्यात आला होता. असे सांगण्यात आले होते की, डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या बॉडी डबल म्हणजेच डुप्लिकेटसोबत फिरत आहेत. पण तेव्हा हे नाकारलं गेलं होतं. पण आता पुन्हा एकदा असा दावा केला जात आहे.
झालं असं की, सोशल मीडियात एक नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ तर्क लावले जात आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्पसोबत नाही तर तिच्या डुप्लिकेटसोबत फिरत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ २४ ऑगस्टचा आहे. यात ४८ वर्षीय मेलानिया ट्रम्प पती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत वायुसेनेच्या एअरफोर्स वन विमानातून बाहेर येताना दिसत आहे.
लोकांचा दावा आहे की, व्हिडीओमध्ये दिसणारी महिला मेलानिया ट्रम्प नाहीये. हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर करत लोक लिहित आहेत की, या व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेचे केस मेलानिया ट्रम्प यांच्या केसांच्या तुलनेत जास्त काळे आहेत. इतकेच नाही तर त्यांची शारीरिक रचना आणि हावभावही फर्स्ट लेडीसारखे वाटत नाहीयेत.
ट्विटरवर 'द रेसिस्टेंट' नावाच्या एका यूजरने हा व्हिडीओ पोस्ट केला असून प्रश्न विचारला आहे की, व्हिडीओमध्ये दिसणारी महिला मेलानिया ट्रम्पसारखी दिसत आहे का? त्यानंतर यावर वेगवेगळ्या कमेंट येऊ लागल्या. एका यूजरने लिहिले आहे की, व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेचं वजन मेलानियापेक्षा कमीत कमी ९ किलो कमी वाटत आहे. मेलानिया चीक बोन्स आणि व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेचे चीक बोन्समध्येही फार फरक आहे. काही लोकांनी तर या महिलेच्या शारीरिक हालचालीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
एका यूजरने लिहीले की, फर्स्ट लेडी पूर्ण आत्मविश्वासाने चालते आणि जोरदार पद्धतीने हात मिळवते. पण व्हिडीओमध्ये दिसणारी महिला असे करताना दिसत नाहीये. ही निश्चित मेलानिया ट्रम्प नाहीये. अनेक यूजर्सनी या व्हिडीओतील महिलेचे आणि मेलानिया ट्रम्प यांचे फोटो एकत्र शेअऱ करत तुलनाही केली आहे.
दरम्यान गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अभिनेता आणि कॉमेडियन वॅगनर बार्टनने फेसबुकवर पहिल्यांदा मेलानियाच्या बॉडी डबलची थेअरी शेअर केली होती. गेल्या महिन्यात याच प्रकारच्या शंकाना बळ मिळाले जेव्हा नाटो समिट दरम्यान मेलानिया ट्रम्प यांचे वेगळे दिसणारे केस आणि आयब्रोज समोर आले.
काही दिवसांपूर्वी १४ मे ला अशी माहिती समोर आली होती की, मेलानिया ट्रम्प किडनीच्या समस्येने ग्रस्त आहे. त्यामुळे त्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये ५ दिवस भरती होत्या. मेलानिया १९ मे रोजी व्हाईट हाऊसला परतल्या. त्या बरेच दिवस दिसल्या नाही. त्यामुळे अर्थातच फर्स्ट लेडीच्या अनउपस्थितीवर प्रश्न विचारले जाणारच.
काही लोकांचं असंही म्हणनं आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत दिसणारी महिला ही एक सिक्रेट एजंट आहे. जी मेलानियासारखे कपडे परिधान करुन ट्रम्प यांच्यासोबत असते. पण सध्या तरी याचं अधिकृतपणे खंडन करण्यात आलं नाहीये.