सोशल मीडियामुळे सध्या सग खूप जवळ आले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशात एकमेकांविरोधात मोठा विरोध आहे. सोशल मीडियामुळे या दोन देशातील प्रेमाच्या गोष्टीही समोर आली आहेत. सध्या सोशल मीडियावर एक किस्तानी तरुणीची लव्हस्टोरी समोर आली आहे. ती तरुणी भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली आहे. आता तिच्या बहिणीला प्रोजेक्ट मिलाप अंतर्गत भारत-पाक सीमेवर म्हणजेच वाघा बॉर्डरवर लग्न करायचे आहे. याप्रकरणी मुलीच्या बहिणीनेही एक ट्विट केले आहे.
पाकिस्तानी तरुणीला भारतीय तरुणाशी लग्न करायचे आहे. आता ती लग्नाची वाट पाहत आहे. तरुणीच्या बहिणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तिच्या बहिणीचे नाव मिशाल आहे, तिने तिचा फोटो ट्विटरवर शेअर केला आणि लिहिले की, तिच्या बहिणीचे भारतीय तरुणावर प्रेम आहे, या ट्विटमध्ये केकचे छायाचित्रही आहे, केकवर प्रोजेक्ट मिलाप लिहिले आहे.
'तिला या विषयावर आणखी कोणतीही चर्चा करायची नाही. मिशालने अनेक ट्विट शेअर केले आहेत. वाघा बॉर्डरवर दोघांचे लग्न व्हावे यासाठी ती प्रयत्नशील असल्याचा दावाही तिने ट्विटमध्ये केला आहे. मिशालने सांगितले की, ती या लग्नासाठी अनेकांना राजी करण्याचा प्रयत्न करत आहे.
२००४ मध्ये शाहरुख खान आणि सुष्मिता सेन यांचा एक चित्रपट आला होता, ज्याचे नाव होते 'मैं हूँ ना'. या चित्रपटातच भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दाखवणारा 'प्रोजेक्ट मिलाप' दाखवण्यात आला होता. त्याच धर्तीवर पाकिस्तानी मुतरुणीची बहीण मिशाल सांगते की, तिला वाघा बॉर्डरवर तिच्या बहिणीचे भारतीय तरुणाशी लग्न करून प्रोजेक्ट मिलाप पूर्ण करायचा आहे.
या तरुणीचे हे ट्विट साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. याशिवाय २६४ जणांनी ते रिट्विट केले असून साडेचार हजारांहून अधिक लोकांनी ट्विटला लाईक करून मजेदार कमेंट्स केल्या आहेत.