भारतात कोणत्याही गोष्टीचा जुगाड होऊ शकतो हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल. पण परदेशातील लोकंही जुगाड करण्याबाबत मागे नाहीयेत. ते आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये. आता तुम्ही म्हणाल असं का? तर हे फोटो पाहिल्यावर तुम्हाला माझं बोलणं पटेल. सोशल मीडियात सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल झालाय. न्यूझीलॅंडची एक महिला प्लास्टिकच्या बॉटलपासून तयार ही चप्पल ऑनलाईन विकत आहे. हे तर काहीच नाही याची किंमत वाचून तर तुम्हाला धक्काच बसेल. ती महिला ही चप्पल १४२३ रुपयांना(२० डॉलर) विकत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन काहीही विकलं जात असल्याच्या बातम्या तुम्ही नेहमीच वाचत असता. गेल्या काही दिवसांपासून नारळांची करोटी म्हणजेच टणक कवच ३ हजार रुपयांना विकलं जात आहे. बरं, यावर डिस्काऊंटही दिलं जात आहे. डिस्काऊंट देऊन याची किंमत १३६५ रुपये इतकी आहे.
तसं पहायलं गेलं तर ही जुगाडू चप्पल टाकाऊपासून टिकाऊ म्हणून चांगला प्रयोग आहे. पण ही चप्पल इतक्या रुपयांना कुणी विकत घेईल याबाबत शंका वाटते. पण ऑनालाइन काहीही विकलं जाऊ शकतं, फक्त विकणारा पाहिजे, याचंच हे उदाहरण आहे.