अंतराळातून विश्व वेगळंच दिसतं. अंतराळातून असं बरंच काही बघायला मिळतं जे आपल्याला जमिनीवर राहून बघणं शक्य नाही. आपल्या सर्वांना हे माहीत आहेच की, सूर्य उगवल्यावर दिवस आणि सूर्यास्त झाल्यावर रात्र होते. पण याच दिवस आणि रात्रीसंबंधी एक भन्नाट फोटो अंतराळवीर Bob Behnken ने त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केली आहे. यात लोकांना दिसत आणि रात्र एकाच वेळी बघायला मिळत आहे. या फोटोत रात्र आणि दिवसामधील सीमा आहे. म्हणजे दिवसाची रात्र होताना यात बघता येऊ शकतं.
हा फोटो अंतराळवीर Bob ने 29 जून रोजी ट्विटरवर शेअर केला होता. याच्या कॅप्शनला त्यांनी लिहिले होते की, 'आपल्या प्लॅनेटचा माझा सर्वात आवडता नजारा. ज्यात दिवस आणि रात्र यांच्यातील सुंदर सीमा बघता येऊ शकते'. त्यांचा हा फोटो आत सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या अद्भूत फोटोला 59 हजारपेक्षा जास्त लाइक्स आणि 8 हजारांपेक्षा जास्त रि-ट्विट मिळाले आहेत.
नासाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, Robert L. Behnken म्हणजे Bob Behnken स्पेस एक्स मिशनसाठी 30 मे 2020 रोजी लॉन्च झालेल्या कमांडर ऑपरेशन अंतर्गत अंतराळात आहेत.
Viral Video : बघा हरणाच्या चलाखीसमोर सिंहाचा झाला 'पोपट', कंट्रोल नसेल तर पॉवरचा काय फायदा!