यु-ट्यूबवर आपलं कौशल्य दाखवून त्यातून उत्पन्नाचा मार्ग निर्माण केलेली अनेक उदाहरण दिसून येतात. कारण जगातील कोणत्याही ठिकाणी असताना युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपला व्हिडीओ इतरांपर्यंत पोहोचवता येतो. फोर्ब्स मासिकाच्या माहितीनुसार, ९ वर्षीय रेयान काजी यंदा यूट्यूबवर सर्वाधिक कमाई करणारा निर्माता कंटेंट क्रिएटर (Year's Highest-Paid YouTuber) ठरला आहे.
रेयान काझीने 2020 मध्ये आपल्या YouTube चॅनेलवर 29.5 दशलक्ष डॉलर्ससह सर्वाधिक कमाई केली. यासह, तो यूट्यूबवरील सर्वाधिक कमाई करणारा कंटेंट क्रिएटर बनला आहे. रेयानच्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे “रेयान्स वर्ल्ड” आहे. रेयान काझी, ज्याचे खरे नाव रेयान गुआन आहे. 2015 मध्ये जेव्हा तो चार वर्षांचा होते तेव्हा त्यानं YouTube व्हिडिओ बनविणे सुरू केले.
रेयान त्याच्या यूट्यूब चॅनेलवर विविध विज्ञान संबंधित DIY प्रयोग करतो आणि बाजारात येत असलेल्या नवीन खेळण्यांचा आढावा घेतो. याशिवाय तो आपल्या चॅनेलवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा कंटेट सादर करतो. रेयानच्या पालकांनी २०१५ मध्ये हे चॅनेल सुरू केले आणि आता याला ५ वर्षे झाली आहेत परंतु त्यानंतरही त्यांचे २२.७ दशलक्षाहूनही अधिक सबसक्रायबर्स आहेत. याला म्हणतात इच्छाशक्ती! ६२ वर्षांच्या आजी २३० किमी ड्रायविंग करत सिंघू बॉर्डरवर पोहचल्या
आज तिसरीच्या वर्गात शिकणारा रेयान आपल्या आईवडिलांबरोबर ९ यूट्यूब चॅनेल्स चालवितो. त्याचे बरेच व्हिडिओ एक अब्जाहूनही जास्त वेळा पाहिले गेले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून रेयानने यूट्यूबवर सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम केला आहे. १ नंबर जुगाड! पठ्ठ्यानं एम्बॅसेडर कारला बैलगाडी बनवलं; अन् आनंद महिंद्रा म्हणाले...., पाहा व्हिडीओ