Swiggy Online Food Delivery : भारतात लग्नाचे/साखरपुड्याचे नियोजन करण्यासाठी खूप मेहन घ्यावी लागते. जेवणापासून ते डेकोरेशन अन् इतर सर्व व्यवस्था करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. यातील जेवणाचे काम सर्वात अवघड असते. पाहूण्यांना चांगले जेवण मिळावे, यासाठी विशेष लक्ष दिले जाते. पण, कल्पना करा की, लग्नातील/साखरपुड्यातील सर्व जेवण ऑनलाईन मागवले तर? सध्या सोशल मीडियावर एका अनोख्या साखरपुडा सोहळ्याची चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमात चक्क Swiggy वरुन जेवण मागवण्यात आले.
युजरची पोस्ट व्हायरल झालीया अनोख्या सोहळ्याची माहिती @shhuushhh_ नावाच्या युजरने एका पोस्टद्वारे दिली आहे. युजरने सांगितले की, एका साखरपुडा सोहळ्यात सर्व जेवण ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीवरुन ऑर्डर करण्यात आले. फोटोत, स्विगीचा डिलिव्हरी बॉय टेबलवर फूड पॅकेट ठेवताना दिसत आहे.
Swiggy चे मजेशीर उत्तरही पोस्ट व्हायरल होताच स्विगीनेही मजेशीर उत्तर दिले आहे. स्विगीने लिहिले- या व्यक्तीशिवाय इतर कुणीही आमच्या डीलचा फायदा घेतला नाही. लग्नाचे जेवण आमच्याकडून ऑर्डर केले. स्विगीकडून मिळालेला हा प्रतिसाद पाहता, भविष्यात ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मद्वारे विवाहसोहळ्यासाठी खाद्यपदार्थ ऑर्डर करणे सामान्य होईल असे दिसते.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाया पोस्टवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. लोक या अनोख्या कल्पनेचे कौतुक करत आहेत आणि भविष्यातील विवाहसोहळ्यातही अशा नवनवीन पद्धतींची अपेक्षा करत आहेत. अनेक नेटकरी या पोस्टवर मजेशीर कमेंट्स आणि मीम्स शेअर करत आहेत.