अमरोहा : उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात एका विवाहसमारंभात अनोखा प्रकार घडला. लग्नानंतर आयोजित मेजवानीत वराकडून आलेल्या पाहुण्यांसाठी वधूकडील लोकांनी वेगळेच फर्मान काढले. आधार कार्ड असेल त्यांनाच जेवणाची परवानगी देण्यात आली. मात्र आधार कार्ड नसल्याने अनेक पाहुणे जेवण न करताच रागावून परतले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी हसनपूर येथील एका वस्तीत दोन लग्नांचे आयोजन होते. त्यामुळे लग्नाच्या दोन वराती परिसरात आल्या होत्या. एका लग्नात जेवणाचा कार्यक्रम लवकर सुरू झाला. दुसऱ्या लग्नासाठी आलेले काही पाहुणेही त्याच मेजवानीत सामील झाले आणि जेवणावर तुटून पडले. पाहुण्यांची इतकी जास्त संख्या पाहून नवरीकडील लोक चिंताग्रस्त झाले, थोड्याच वेळात जेवण बंद केले.
नेटकऱ्यांकडून २१ तोफांची सलामी! या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. नेटकरीही भारताच्या इतिहासातील अशी पहिली लग्नाची वरात असेल... वाह-वाह हसनपूरवासीयांच्या अशा आदरातिथ्याबद्दल २१ तोफांची सलामी अशा अतिशय मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.