सोशल मीडियावर नेहमीच असे अनेक फोटो व्हायरल होत असतात जे लोकांना हैराण करून सोडतात. कधी ऑप्टिकल इल्यूजन फोटो पाहून लोक थक्क होतात. त्यातील गोष्टी शोधणं लोकांसाठी अवघड होऊन बसतं. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक साप लपलेला आहे. पण हा साप लोकांना दिसत नाहीये.
Sunshine Coast Snake Catchers 24/7 हा फोटो शेअर करून लोकांना साप शोधण्याचं चॅलेंज दिलं आहे. मुळात या फोटोत बराच काडी कचरा पडलेला आहे आणि त्यात एक साप लपला आहे. कचराच इतका आहे की, साप शोधणं सोपं नाही. पण तुमची नजर जर तीष्ण असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर तुम्ही यातला साप शोधू शकता.
हा फोटो तसा जुना आहे, पण आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही लोकांना या फोटोत लपलेला साप दिसला. पण काही लोकांनी अनेक प्रयत्न करूनही त्यांना साप काही दिसला नाही. कारण यातील साप फारच लहान आणि बारीक आहे. तो फारच बारकाईने पाहिला तरच तुम्हाला दिसू शकतो.
तुमचं काम सोपं करण्यासाठी आम्ही फोटो दोन भागात विभागला आहे. तरी तुम्हाला साप दिसत नसेल तर मग तुम्हाला आणखी लक्ष देऊन बघण्याची गरज आहे.