तुरूंग किंवा जेल असे शब्द ऐकून लोकांना भीती वाटते. कारण आपण नेहमीच वेगवेगळ्या सिनेमातून जेलमधील भयंकर दृश्य पाहत असतो. कोणत्याही सोयी-सुविधा नसताना चार भींतींच्या आता कैद्याला राहावं लागतं. सध्या सोशल मीडियावर एका आगळ्या वेगळ्या तुरूंगाचा फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटोज पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण हे आपल्या कल्पनेतील जेल नसून सगळ्या सोयी सुविधा असलेलं एखादं आलिशान हॉटेल असावं तसा हा तुरूंग आहे.
@IDoTheThinking या ट्विटर युजरने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सॅन फ्रांसिस्कोच्या ३ हजार डॉलर प्रती महिना भाड्याच्या इमारतीप्रमाणे हा नॉर्डिक तुरूंग आहे. आतापर्यंत १ लाखापेक्षा जास्त लोकांनी हे फोटो पाहिले असून २४ हजारापेक्षा जास्त लोकांनी हे फोटे रिट्विट केले आहेत. काही सोशल मीडिया युजर्सनी राग व्यक्त केला असून काहींना कौतुक सुद्धा केलं आहे.
नादच खुळा! सुनेच्या इच्छेसाठी सासऱ्यानं थेट हेलिकॉप्टर मागवलं; पाठवणीसाठी अख्ख्या गावाची गर्दी
त्यांनी या फोटोंजना कॅप्शन दिलं आहे की, कैदी लोकांना त्याच्या नैराश्यमय आणि अपराधिक जीवनापासून दूर करून एक सकारात्मक बदल घडवणं तसंच या कैद्यांचे पुर्नवर्सन हे तुरूंगाच्या ठेवणीमागील उद्दीष्ट आहे. या तुरूंगातील वातावरणाचा चांगला परिणाम होईल अशी व्यवस्थापनाला आशा आहे.
नशिब चमकलं! मासा किंवा कासव नाही तर समुद्र किनारी मासेमारांना सापडलं सोनं, मग...
अशा आगळया वेगळ्या तुरूंगाचे फोटो पाहून लोक सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. अनेकांनी आलिशान तुरूंग व्यवस्थेवर नाजारी व्यक्त केली आहे. काहींना कौतुक केले आहे. हे तुरूंग आमच्या घरापेक्षा मस्त असल्याची कमेंट एका सोशल मीडिया युजरने केली आहे.