Railway Viral Video: सोशल मीडियावर स्क्रोल करताना कितीतरी रील्स तुम्हाला दिसतात. अधिकाधिक फॉलोअर्स वाढवण्यासाठी हल्ली काहीही प्रकार केले जात असल्याचे दिसत आहे. काही जण तर रील्ससाठी जीवही धोक्यात घालत आहेत. असाच एक प्रकार समोर आला आहे. एक तरुण रील्ससाठी रेल्वे रुळावर झोपला आणि रेल्वे जातानाचा व्हिडीओ शूट केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तरुणाने रीलसाठी कसा जीव धोक्यात घातला, हे दिसत आहे. छोटी चूक झाली असती, तर त्याला जीव गमवावा लागला असता.
रुळावर झोपून रेल्वेचा बनवला व्हिडीओ
एक तरुण मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग सुरू करून रेल्वे रुळावर झोपतो. काही वेळाने एक्स्प्रेस येते आणि निघून जाते. एक्स्प्रेस जातानाचा हा व्हिडीओ शूट करण्यासाठी त्याने जीव धोक्यात घातला. सुदैवाने यात त्याला कोणतीही इजा झाली नाही.
व्हिडीओ बघा
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, लोक याबद्दल संताप व्यक्त करत आहेत. तरुणाने रीलसाठी केलेली कृती मुर्खपणाची असल्याचे काही जणांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावरील प्रसिद्धीची लत अनेकांना लागली असल्याचे दिसत आहे. या तरुणानेही त्यामुळेच ही गोष्ट केल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. काही जणांनी या तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.