शहरं
Join us  
Trending Stories
1
कंगना राणौत दोनवेळची डिफॉल्टर, लाईट बिल १ लाख कसे आले?; हिमाचलच्या वीज मंडळाने हिस्ट्रीच काढली...
2
“राणाला आणणे भारताचा मोठा विजय, आता डेविड हेडली, हाफिज सईदचा नंबर”; PM मोदींचेही केले कौतुक
3
रात्रीच्या वेळी दहशतवादी गट शिक्षकाच्या घरात घुसला; फोन केला अन् घरातील वस्तू पळवल्या
4
Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून बाहेर, पुन्हा धोनीकडे सीएसकेचे कर्णधारपद!
5
पोलिसांनी दोन वेळा गेलेले पैसे परत मिळवून दिले, पण कोट्यधीश होण्याच्या नादात तिसऱ्यांदा लुटला गेला...
6
Phil Salt Run Out : विराटनं धाव घेण्यास दिला नकार; मागे फिरताना पाय घसरला अन् सॉल्ट झाला 'रन आउट'
7
धक्कादायक! लातूर ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला पोलिस हवालदार, 17 कोटींचा माल जप्त
8
CSK ला धक्का! पण MS धोनी पुन्हा कॅप्टन झाल्याचा आनंद; ऋतुराज 'आउट' झाल्यावर अशा उमटल्या प्रतिक्रिया
9
“तहव्वूर राणाला अमेरिकेने देऊन टाकले, हिंमत असेल तर दाऊदला आणा”; संजय राऊतांचे आव्हान
10
'अजमल कसाबला इतक्या लवकर फाशी द्यायला नको होती...', तहव्वूरच्या प्रत्यार्पणावर माजी पाकिस्तान उच्चायुक्त काय म्हणाले?
11
“...तर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची”; राज ठाकरेंचे असोसिएशनला पत्र, दिला थेट इशारा
12
आता 6 लाखांच्या कारमध्ये मिळणार 6 एअरबॅग्ज; भारताची आवडती कार बनली आणखी सुरक्षित
13
'UPA सरकारच्या धोरणात्मक मुत्सद्देगिरीचे परिणाम', तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर पी चिदंबरम यांनी स्पष्टच सांगितले
14
"चमकता तारा...!"; प्रियांश आर्यच्या शतकी खेळीवर प्रीती जाम खुश झाली, सेल्फीसह इंस्टावर लांबलचक पोस्ट लिहिली
15
हे चाललंय काय...? चीन म्हणाला, 'धमक्या आणि ब्लॅकमेलिंगनं मार्ग निघणार नाही'; ट्रम्प यांनी केलं जिनपिंग यांचं कौतुक, म्हणाले...
16
सरकारी नोकरी सोडून विनेश फोगटने निवडला ४ कोटींच्या बक्षिसाचा पर्याय; समोर आले कारण
17
“राणाला आणायला १५ वर्षे का लागली, महापालिका निवडणुकीत उपयोग करून घेण्याचा प्रयत्न”: काँग्रेस
18
लग्नापूर्वीचे अफेअर...! विवाहिता माहेरी आलेली, खोलीत झोपली होती, एक्स प्रियकर तिथे आला, मग... 
19
“भारताचे मोठे यश”; तहव्वूर राणाला भारतात आणल्याबाबत उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
20
१३७० कोटींचा मालक आहे 'हा' अभिनेता, जिथे कुठे प्रवास करतो, तिथे तो एक कुकर घेऊन जातो

फॉर्च्यूनरच्या किमतीपेक्षा महागडी नंबरप्लेट, केरळच्या व्यावसायिकाने लावली सर्वात मोठी बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 21:16 IST

या नंबरप्लेटची मूळ किंमत फक्त 3 हजार रुपये होती.

Lamborghini Urus : तुम्ही आतापर्यंत अनेक महागड्या गाड्या पाहिल्या असतील. अनेकांना महागड्या गाड्यांची आवड असते. काहींना तर आपल्या गाडीसाठी व्हीआयपी नंबर प्लेटही हवी असते. यासाठी ते हजारो-लाखो रुपये खर्च करायला तयार असतात. परंतु अलीकडेच केरळमधील एका हौशी व्यक्तीने आपल्या कारच्या नंबर प्लेटसाठी इतके रुपये खर्च केले, जितक्या रुपयात टोयोटा फॉर्च्युनर मिळाली असती.

केरळमधील लिटमस सेवन सिस्टम्स कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वेणू गोपालकृष्णन यांनी त्यांच्या 4 कोटी रुपयांच्या लॅम्बोर्गिनी उरुस सुपर कारसाठी '07 DG 0007' हा नंबर खरेदी केला आहे. या कारच्या नंबरप्लेटसाठी त्यांनी तब्बल 46 लाख रुपये खर्च केले. हा नंबर केरळमध्ये लिलावात येणारा आतापर्यंतचा सर्वात महागडा नंबर बनला आहे. 7 एप्रिल रोजी केरळ मोटार वाहन विभागाने ऑनलाइन लिलाव आयोजित केला होता. 

मूळ किंमत फक्त 3 हजार रुपये होतीविशेष म्हणजे, या नंबर प्लेटसाठी लिलावात फक्त 3 हजार रुपये मूळ किंमत होती. कोणी विचारही केला नव्हता की, या नंबरप्लेटसाठी 46 लाख रुपयांची बोली लागेल. या लिलावात एकूण 5 खरेदीदार बोली लावत होते. शेवटच्या क्षणी दोन खरेदीदारांमध्ये स्पर्धा रंगली अन् शेवटी वेणू गोपालकृष्णन यांनी बोली जिंकली. वेणू गोपालकृष्णन यांनी आपल्या इंस्टाग्रामवर पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यांनी स्वतःला त्यांच्या नवीन लाईम ग्रीन लॅम्बोर्गिनी उरुसची डिलिव्हरी घेताना दाखवले. वेणू म्हणाले की, केरळमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच कार आहे. 

टॅग्स :KeralaकेरळSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेcarकार