(image credit- myrnss.com, hamiltondiocese)
कोरोनामुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली. साधारणपणे मार्च-एप्रिल या महिन्यात लग्नसमारंभाचा काळ असल्यामुळे लॉकडाऊनमुळे अनेकांना आपली लग्न पुढे ढकलावी लागली. तर काहींनी आहे त्या स्थिती नियमांचे पालन करत लग्नगाठ बांधली आहे. असाच एक प्रकार लंडनमध्ये सुद्धा घडला आहे. कोरोना वॉरिअर्स म्हणजेच नर्स आणि डॉक्टरने एकमेकांशी लग्न केलं आहे. ज्या रुग्णालयात हे दोघे काम करतात त्याच ठिकाणी त्यांनी लग्न केलं आहे.
Jaan tapping आणि Annalan Navaratnam यांनी लंडनच्या थॉमस हॉस्पिलटमध्ये लग्न केलं आहे. या दोघांनी ऑगस्टमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. उत्तर आयलँड आणि श्रीलंकेला जाण्याचा त्यांचा विचार होता. पण कोरोनाच्या माहामारीमुळे शक्य झालं नाही.जॅन ही नर्स आणि अन्नालन हा डॉक्टर आहे. त्यांनी आपल्या नातेवाईकांना लाईव्ह स्ट्रिंमिंगद्वारे लग्नात सहभागी करून घेतले.
हेल्थ सेक्रेटरी मॅट्ट हॅनकुक यांनी हा फोटो सोशल मीडीयावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होत आहे. एकिकडे डॉक्टर आणि नर्सेसचे कामाचे तास वाढत जात आहेत. अशात या कोरोना वॉरिअर्सने लग्न करून जगासमोर उदाहरण ठेवलं आहे. यांनी सांगितले की, आनंदाने जगण्यासाठी सध्याच्या परिस्थितीला अनुसरून योग्य वाटेल तेच सगळ्यांनी करायला हवं.
अहो, हरणाला काय बघताय? टक लावून पाहा अन् फोटोतील शिकारी वाघाला शोधून दाखवा
Video : माकडानं वाघाची खोडंच मोडली; त्यानं काही करायच्या आत सणसणीत कानाखाली मारली