ओडिशातील भुवनेश्वरमध्ये काही एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट समोर आली आहे. जी पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एक दुर्लभ साप दिसून आला आहे. आतापर्यंत साप तुम्ही जमिनीवर सरपटताना पाहिला असेल पण उडणारा साप तुम्ही पाहिला आहे का? हा साप उडतो.
ओडीशामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीकडे हा साप होता. ती व्यक्ती या सापाचा उपयोग पैसे कमावण्यासाठी करत होती. सापा कसा उडतो, हे लोकांना दाखवून पैसे मागत असे. वन विभागाला या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सापला जंगलामध्ये सोडण्याचा निर्णय घेतला.
भुवनेश्वरमधील वन विभागातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'सापाला आपल्याजवळ ठेवणं हे संरक्षण नियमांतर्गत अपराध आहे. आम्ही याबाबत अधिक चौकशी करत असून आम्ही सापाला जंगलामध्ये सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार, जंगली प्राण्यांना कोंडून ठेवणं, त्यांचा व्यापार करणं या गोष्टी करणं म्हणजे गुन्हा असून त्यासाठी कठोर शिक्षा किंवा दंडही होऊ शकतो.