भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या केसेसमध्ये वाढ होत आहे. देशात आतापर्यंत 251 केसेस आढळून आल्या आहेत. यातील 32 परदेशी आहेत. त्यामुळे कोरोनाला एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनवर स्ट्रेस करण्यासाठी लोकांची तपासणी केली जात आहे. असाच एक तपासणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक अधिकारी किती बेजबाबदारपणे लोकांची तपासणी करत आहेत हे दिसतंय. यावर लोक चांगलेच भडकले आहेत.
हा व्हिडीओ @aaqibrk नावाच्या यूजरने सोशल मीडियात शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक संतापले आहेत. या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे हे मात्र पोस्टमध्ये सांगण्यात आलेलं नाही.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक अधिकारी खुर्चीवर बसून आरामात फोनवर बोलत फक्त नावाला लोकांची तपासणी करत आहे. कोरोनामुळे हजारो लोकांचा जीव जात असताना अशाप्रकारचं बेजबाबदारपणा अंगाशी येऊ शकतो.
कोरोनाची लागण झालेले सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. दुसऱ्या क्रमांकावर केरळ आहे. कोरोनासंबंधी माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी +91-11-23978046 हा हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे.