अनेक लोकांना प्राणी पाळणं आणि त्यांच्यासोबत खेळणं आवडतं. इतकंच नाही तर आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या पाळीव प्राण्यांसोबतच घालवतात. त्यांचे मजेदार व्हिडीओही सोशल मीडियावर (Social Media) शेअर करतात. काही व्हिडीओ तर बघता बघता व्हायरल (Viral Video) होतात. त्यांना लाखो-कोट्यावधी व्ह्यूज मिळतात. असाच एका व्यक्तीचा सापासोबतचा व्हिडीओ (Snake Viral Video) चर्चेचा विषय आहे. यात व्यक्ती सापाला किस करत आहे.
सामान्यपणे सापाचं नाव ऐकताच लोक घाबरतात. अशात कुणाचा सापाशी सामना झाला तर लोक फूल स्पीडने पळत सुटतात. पण या व्हिडीओत एक व्यक्तीसोबत गंमत करत आहे. हा व्हिडीओ पाहून थक्क व्हायला होतं. तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती खुर्चीवर बसून आहे आणि त्याच्या हातात पुस्तक आहे. तर समोर टेबलवर एक मोठा साप फणा काढून बसला आहे. आधी तर साप इकडेत-तिकडे फणा मारतो. काही वेळाने साप त्या व्यक्तीच्या तोंडावर जवळ जातो. व्यक्ती त्याच्या नजरेला नजर मिळवतो आणि डोकं सापाजवळ नेतो. असं वाटतं की, दोघे एकमेकांना किस करत आहेत. इतकंच नाही तर व्यक्ती सापाला एकदा किसही करतो.
दोघांना बघून असं वाटतं की, दोघांमध्ये चांगलीच मैत्री आहे. पण ज्याप्रकारे साप फणा मारतो आहे ते बघून असं वाटतं की, काहीतरी खतरनाक होऊ शकतं. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ 'pindawaallejatt' नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. काही लोक व्हिडीओ पाहून व्यक्तीचं कौतुक करत आहेत तर काहींना संताप व्यक्त केला.