एखादं विमान हवेतच क्रॅश झाल्याचं ऐकलं तरी अंगावर शहारा येतो. त्यात विमान क्रॅश होऊन समुद्रात पडणार म्हटल्यावर तर विषयच संपतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात प्लॅन क्रॅश झाल्याचं बघायला मिळतं. यात पायलट आणि त्याची गर्लफ्रेन्ड होती. दोघेही समुद्रात पडले. पण दोघेही तिथे न घाबरता सेल्फी काढताहेत आणि रिलॅक्स वाटताहेत. म्हणजे काही भीती त्यांच्या चेहऱ्यावर बघायलाच मिळत नाहीये.
David Lesh ही व्यक्ती अमेरिकेच्या सॅन होजेमध्ये राहते. येथूनच त्याने त्याचं एअरक्राफ्ट उडवलं होतं. यावेळी त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेन्ड Owen Leipelt होती. विमान हवेत असताना त्याच्या सिंगल इंजिनची पॉवर गेली आणि विमान प्रशांत महासागरात पडलं.डेविडने सांगितले की, विमान जवळुपास ३४०० फूट उंचीवर होतं. अशाच अचानक विमानाचं इंजिन बंद पडलं. सुदैवाने विमान समुद्रात पडण्याआधीच दोघेही बाहेर निघाले होते.
डेविडने सांगितले की, त्याने कारची चावी आणि मोबाइल फोन विमान क्रॅश होतानाच जवळ घेतले. त्यानंतर क्रॅश झालेल्या विमानावरूनच त्यांनी एक व्हिडीओ शूट केला. ज्यात त्यांचं बचावकार्य बघायला मिळतं. दोघेही सुखरूप असून त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे.