दिवाळी हा सण सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा आहे. त्यासाठी, गरिबांपासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत सर्वचजण आनंद वाटताना दिसतात. एकमेकांना शुभेच्छा देणं, एकमेकांच्या घरी जाऊन भेटवस्तू वाटणं हेही दिवाळीच्या सणात आपुलकीने पाहायला मिळते. तसेच, बाजारात खरेदी करतानाही विक्रेता आणि ग्राहक यांच्या चेहऱ्यावर वेगळंच समधान असतं. पाऊस पाणी झाल्याने, पीक पाणी असल्याने बळीराजाही खुश असतो. मात्र, याच आनंदात एखाद्या गरिबासोबत कोणी आर्थितक चेष्टा केल्यास सर्वांनाच वाईट वाटतं. राजधानी दिल्लीतील एका भाजीविक्रेत्या आजोबांसोबत अशीच फसवणूक झाली आहे. मात्र, सोशल मीडियातून या भाजीवाल्या बाबांना मदत मिळाली.
मोठ-मोठ्या शहरातील मॉलमध्ये फळे, पाले भाज्यांचे भाव कधीच कमी होत नाहीत. याउलट रस्त्यावरील भाजीविक्रेत्यापेक्षा तेथे महागच असतात. तरीही, आपण गपगुपाने ती भाजी स्वत:चे स्टेटस जपण्यासाठी विकत घेतो. मात्र, रस्त्यावर भाजीवाल्यासोबत हुज्जत घालत बसतो. ऐन दिवाळीच्या १ दिवस अगोदर दिल्लीत एका भाजीविक्रेत्याला भाजी घेतल्यानंतर नकली नोट देऊन त्याची फसवणू केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे भाजी विकत घेणासाठी आलेल्या दोघांपैकी एकाने चक्क २ हजार रुपयांची नोट दिली होती, तर बाकीचे पैसे दिवाळी भेट म्हणून तुम्हाला राहू द्या, असेही तो म्हणाले. त्यामुळे, गरिबाच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसला. पण, ज्यावेळी ही नोट त्याने आपल्या १२ वर्षांच्या नातवाला दाखवली, त्यावेळी हा आनंद क्षणीक ठरला. कारण, त्या व्यक्तीने मोठी आशा दाखवून गरीबाची चेष्टा केल्याचा प्रकार घडला होता. ती नोट नकली होती.
नोएडा वेस्ट येथील क्रिकेट स्टेडिएमच्या जवळ असलेल्या चार मुर्ती येथे हा प्रकार घडला असून पत्रकार प्रणव मिश्रा यांनी आपल्या ट्वीटरवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. तर या पोस्टनंतर अनेकांनी या गृहस्थाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तर, सध्या ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.