कोरोनाच्या माहामारीने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हाहाकार पसरवला आहे. अशात मुलांच्या अभ्यासात खंड पडू नये तसंच मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन क्लासरूम सुरू करण्यात आले आहे. सरकारी धोरणानुसार अनेक ठिकाणी मुलांना डिजिटल साधनांचा वापर करून शिक्षणं दिलं जात आहे. अशा स्थितीत योग्यपद्धतीनं मुलांना शिकवणं हे शिक्षकांसाठी आव्हान ठरत आहे. अनेक ठिकाणी लॅपटॉप, कॉम्प्यूटर आणि मोबाईलचा अभाव आहे. पण तरिही वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करून शिक्षक आणि विद्यार्थी ऑनलाईन शिकवणीत सहभागी होत आहेत.
सध्या सोशल मीडियावर एका शिक्षिकेचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. ऑनलाईन शिक्षणासाठी केलेला असा जुगाड तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता एका बाईंनी ऑनलाईन शिकवण्या घेण्यासाठी चक्क फ्रीजच्या ट्रेचा वापर केला आहे. यानिमित्ताने फ्रिजच्या ट्रेचा वापर असाही होऊ शकतो. हे अनेकांना पहिल्यांदाच कळलं असेल.
हा फोटो ट्विटरवर मोनिका यादव या सोशल मीडिया युजरने शेअर केला आहे. तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता एका शिक्षिकेनं दोन डब्ब्यांवर फ्रिजमधला ट्रे ठेवला आहे. त्या ट्रेवर आडवा मोबाईल धरून त्या शिकवत आहेत. हा फोटो कुठे आणि कधी काढण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळालेली नाही. सोशल मीडिया युजर्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
मागील काही दिवसातही असाच एक शिक्षकेने ऑनलाईन शिकवण्यांसाठी केलेला जुगाड सोशल मीडियावर तुफान व्हायरल व्हायरल झाला होता. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा फोटो शेअर केला होता.
हे पण वाचा
माकडाच्या हाती लागली भेटवस्तू; पण वापरायची कशी? यासाठी बघा केलं; व्हायरल व्हिडीओ
तब्बल ८४ वर्षानंतर नैनीतालमध्ये दिसला लाल रंगाचा दुर्मिळ साप; खासियत वाचून चकित व्हाल
या झाडावर बसलेल्या पोपटांची संख्या किती? मोजून मोजून थकाल; चॅलेन्ज घेऊनच दाखवा