Optical Illusion Viral Photo: सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हे फोटो बघून लोक कन्फ्यूज होतात आणि त्यात दडलेली गुपितं शोधण्याचा प्रयत्न करतात. पण हे गुपित किंवा प्रश्नांची उत्तर शोधणं इतकंही सोपं नसतं. जगभरात ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो लोकांना गुंतवून ठेवतात. असाच एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जे जरा शार्प असतात ते लवकर उत्तर शोधतात, पण काही लोकांना खूप वेळ देऊनही यातील उत्तर सापडत नाही.
सोशल मीडियावर सध्या एक पेंटिंग चर्चेचा विषय ठरत आहे. ही पेंटिंग भ्रम निर्माण करणारी आहे. ज्यात १३ चेहरे लपलेले आहेत. भलेभले हा फोटो पाहून चक्रावून गेलेत कारण १३ चेहरे त्यांना दिसलेच नाहीत. तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर तुम्ही यातील १३ चेहरे शोधून दाखवा.
या पेंटिंगमध्ये ४ चेहरे सहजपणे दिसतात. पण बाकीचे राहिलेले चेहरे मात्र लोकांना हैराण करत आहेत. कारण ते सहजपणे दिसत नाहीत. ते बारकाईने, डोकं शांत ठेवून शोधावे लागतात. तेव्हाच ते तुम्हाला दिसतील. हे चेहरे मोठे आहेत. इतकंच नाही तर ते दगड आणि गवतात लपलेले आहेत.
४ चेहरे दिसल्यावर तुम्हाला तीन मोठे चेहरे दिसतील. हे चेहरे जरा झुडपांमध्ये आणि झाडांमध्ये लपलेले आहेत. त्यामुळे ते सहज दिसत नाही. ते तुम्हाला फार बारकाईने बघितल्यावरच दिसतील.