Optical Illusion Viral Photo: अनेकदा काही फोटोंमध्ये जे दिसतं ते तसं नसतं. हे फोटो किंवा त्यातील चित्र समजून घेण्यासाठी मेंदूवर जास्त जोर द्यावा लागतो. अशाच फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो व्हायरल होत आहेत. नेटिजन्सही अशा फोटोंवर काही वेळ थांबून प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे.
ऑप्टिकल इल्यूजनचे असे फोटो डोळे आणि मेंदूची परीक्षा घेणारे असतात. हे फोटो बघून लोकांना डोळ्यांवर विश्वास बसत नाही किंवा ते चक्रावून जातात. इतकंच नाही तर या फोटोंमधील रहस्य जाणून घेणंही सोपं काम नसतं. हे रहस्य शोधता शोधता लोकांचं डोकं चक्रावून जातं. एक असाच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो एका जंगलातील आहे. ज्यात बरीच झाडं दिसत आहेत. यात झाडांमध्ये लपला आहे एक प्राणी. जो समोरच आहे पण अनेकांना दिसतच नाहीये.
सोशल मीडियावर बरेच लोक हे रहस्य उलगण्याचा प्रयत्न करत आहेत. पण फोटोत लपलेला जिराफ शोधणं अनेकांना जमत नाहीये. तर काही लोक फारच सहजपणे फोटोतील जिराफ शोधत आहेत. पण जास्तीत जास्त लोकांना जिराफ शोधणं जमत नाहीये. तुम्हाला अजूनही या फोटोत जिराफ सापडला नसेल तर फोटोच्या डाव्या बाजूला झाडाजवळ बघा. तिथे तुम्हाला जिराफ दिसेल.