Optical Illusion Viral Photo : ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे डोळ्याला होणार भ्रम. सध्या हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. असे कितीतरी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंची गंमत अशी असते की, यात काही रहस्य, काही गुपितं काहीतरी लपलेलं असतं. जे समोर दिसतं ते मुळात तसं नसतं. एक असाच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर एक फोटो सध्या व्हायरल होत असून यात एक प्राणी लपलेला आहे. पण हा प्राणी लोकांना सहजपणे दिसत नाहीये. हा प्राणी म्हणजे तुमची फेवरेट मांजर आहे. या फोटोत एक मांजर लपली आहे. पण सोशल मीडिया यूजर्स ही मांजर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. काही मोजकेच लोक आहेत ज्यांना यात लपलेली मांजर दिसली.
या फोटोत एका दरवाजा आहे. ज्यात काही काचांचे चौकोन आहेत. यातील एकामधून एक मांजर बाहेर बघत आहे. पण बराच प्रयत्न करूनही सोशल मीडिया यूजर्सनाही मांजर दिसत नाहीये. मात्र, तुम्ही अधिक एकाग्रतेने आणि लक्ष देऊन तुम्ही या फोटोकडे पाहिलं तर कदाचित तुम्हाला मांजर दिसू शकते.
जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सूटत नाही तर तुम्ही यातील मांजर शोधून दाखवा. इतकंच नाही तर तुम्ही हा फोटो तुमच्या मित्रांना पाठवून त्यांनाही यातील मांजर शोधण्याचं चॅलेंज देऊ शकता. तुम्हाला मांजर दिसली नसेल तर तुम्ही जरा बारकाईने बघू शकता. बारकाईने बघाल तर तुम्हाला नक्कीच यातील मांजर दिसेल.