Optical Illusion Hidden Animal: ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच आपल्या डोळ्यांना चकवा देणारे फोटो. अनेकदा अशाप्रकारचे फोटो पाहून आपलं डोकं काम करत नाही. आजकाल सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन फोटो चांगलेच पसंत केले जातात. या फोटोद्वारे तुम्ही स्वतःची बुद्दी आणि नजर किती तीक्ष्ण आहे, हे जाणून घेऊ शकतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे, ज्यात एक प्राणी लपलाय, पण बडे-बडे शोधून थकले...
या फोटोमध्ये लपलेल्या प्राण्याला शोधण्याचे चॅलेंज आम्ही तुम्हाला देत आहोत. तुमची दृष्टी इतरांपेक्षा जास्त तीक्ष्ण असेल, तर हे चॅलेंज घ्या आणि फोटोतील प्राणी शोधून दाखवा. या फोटोबाबात आम्ही तुम्हाल एक हिंट देतो. 'फोटोमध्ये एक क्यूट प्राणी लपलाय.' या फोटोतील प्राणी शोधून दाखवला, तर आम्ही तुम्हाला जिनियस आणि तुमच्या नजरेला तीक्ष्ण समजू. या व्हायरल फोटोला नीट पाहा आणि फोटोमध्ये कुठे आणि कोणता प्राणी लपलाय, हे सांगा.
या फोटोमध्ये एक लिव्हिंग रुम दिसतीये, ज्यात ख्रिसमस ट्रीला अतिशय सुंदर पद्धतने सजवलंय. या सजावटीसोबतच रुममध्ये काही गिफ्टही ठेवले आहेत. रुमच्या दारासमोर एक आराम खुर्ची आणि सेंटर टेबलदेखील दिसतोय. तुम्हाला शोधून काही सापडत नसेल, तर आम्ही सांगतो. या फोटोमध्ये एक कुत्रा लपलाय. हा कुत्रा आराम खुर्चीच्या मागे आहे, ज्याच्या फक्त डोक्याचा वरचा भाग दिसतोय. तुम्ही आधीच शोधला असेल, तर तुमची नजर तीक्ष्ण आहे असे समजा.