Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. ज्यातील रहस्य शोधण्यात लोकांना नेहमीच मजा येते. पण आज एक खूपच वेगळा ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला असं काही शोधायचं आहे जे शोधताना तुम्हाला डिटेक्टिव झाल्यासारखं वाटेल.
या ऑप्टिकल इल्यूजन फोटोत तुम्हाला एका महिलेचा मारेकरी शोधायचा आहे. सांगितलं होतं ना की, तुम्हाला या फोटोतील बाब शोधताना डिटेक्टिव झाल्यासारखं वाटेल! तर या फोटोत तुम्हाला एक रेस्टॉरन्ट दिसतय. ज्याच्या बाथरूममध्ये एका महिलेचा मृतदेह पडलाय. तुम्हाला या महिलेच्या मारेकऱ्याचा शोध घ्यायचा आहे.
मृत महिलेचा मारेकरी शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे. या फोटोकडे बारकाईने बघा तेव्हाच तुम्हाला या खूनाचा छडा लावता येणार आहे. या फोटोत पाच संशयीत आहेत. या पाच संशयीतांपैकी एकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव उडाले आहेत. त्याशिवाय मृत महिलेच्या हातात शर्टचा फाटलेला कापडही दिसत आहे. जर ही हिंट देऊनही तुम्हाला खूनी सापडला नसेल तर खाली उत्तर दिलं आहे.
यातील व्यक्ती नंबर 4 हा महिलेचा मारेकरी आहे. कारण त्याच्या मानेवर निशाण आहे. तसेच तोच रेस्टरूमच्या जास्त जवळ आहे. त्याच्याकडे चाकूही नाही आणि महिलेच्या हातात त्याच्या शर्टचा फाटलेला कपडा आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, यातील रहस्य उलगडणाऱ्या व्यक्तींमध्ये फारच कमी लोकांचा समावेश आहे.