Optical Illusion : फोटोंमध्ये काही शोधण्याचं चॅलेंज असेल तर लोकांचं डोकं चक्रावून जातं. पण हेही खरं आहे की, असे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी लोकं खूप डोकं लावतात आणि असं करणं एन्जॉयही करतात. ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील रहस्य उलगडताना लोकांच्या मेंदू आणि डोळ्यांची टेस्टही होते. रोज जर सगळ्यांनी मेंदूची अशी कसरत केली तर त्याने ऑब्जर्वेशन स्किल आणि आई क्यू लेव्हल चांगलीच होणं आहे.
सध्या सोशल मीडियावर एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत तुम्हाला किती घोडे आहेत हे सांगायचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. काही घोडे तर यात स्पष्टपणे दिसत आहेत, पण त्यांची एकूण संख्या किती हे शोधणं जरा अवघड काम आहे. त्यासाठी तुमच्या तीक्ष्ण नजर असणं गरजेचं आहे.
हा फोटो लोकांच्या मेंदू आणि डोळ्यांसमोर जबरदस्त भ्रम निर्माण करत आहे. यातील रंगामुळे हा सगळा घोळ झाला आहे. पण तरीही ज्यांच्याकडे चांगली नजर आहे तेच यातील घोड्यांची संख्या सांगू शकतील. थोडं अवघड काम आहे पण अशक्य नक्कीच नाही. पण त्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंद आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील रहस्य उलगडताना अनेकदा मेंदूही अवघडतो. पण यात एक मजाही येते. त्यामुळेच तर सोशल मीडियावर असे चॅलेंजेस नेहमीच व्हायरल होत असतात. तसा तर हा जुनाच फोटो आहे, पण काही लोकांनी पुन्हा एकदा शेअर केला आहे. जर तुम्हाला अजूनही यातील घोड्यांची संख्या समजली नसेल तर खालच्या फोटोत ती दिली आहे. यात एकूण 5 घोडे आहेत.