Optical Illusion : मेंदूची काम करण्यासाठी पद्धत समजून घेतल्यानंतर काही फोटो किंवा पॅटर्न असे तयार केले जातात की, आपली नजर समोर असलेलं सत्य बघू शकत नाही. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. असे वेगवेगळे फोटो अलिकडे सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो आणि त्यातील रहस्य समजून घेण्यासाठी लोकांना खूप मेहनत घ्यावी लागते.
@purpzsaur नावाच्या टिकटॉक यूजरने शेअर केलेला एक फोटो सध्या लोकांना हैराण करत आहे. यात न्यूमेरिक पॅटर्न दिलं आहे. लोकांना या पॅटर्नमध्ये एकूण 10 नंबर्स शोधून काढायचे आहेत. जे कुणी हे चॅलेंज पूर्ण करेल, अर्थातच त्यांचा मेंदू इतर सामान्य लोकांपेक्षा जास्त चपळ चालते हे दिसून येईल. कारण हे काही सोपं काम नाही.
या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये काही न्यूनेरिक पॅटर्न दिले आहेत, ज्यातून 10 नंबर्स शोधायचे आहेत. एकाच फोटोत 10 नंबर शोधणं सोपं काम नाही. जास्तीत जास्त लोकांनी सहजपणे फोटोतून 6, 8 आणि 4 नंबर शोधले आहेत. कारण ते एकमेकांशी जुळलेले आहेत. तर काही लोकांनी जास्त मेहनत घेऊन फोटोत 1,2,3,4,6 आणि 8 नंबर शोधले आहेत.
अशाप्रकारे नंबरचे चॅलेंज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कधी यांमधून नंबर्स शोधायचे असतात तर कधी पॅटर्न मोजायचे असतात. सध्या व्हायरल झालेलं चॅलेंजही काही सोपं नाही. जर लोकांना या 10 नंबर म्हणजे आकडे दिसत नसतील तर त्यात त्यांची चुकी नाही. हे कामच ट्रिकी आणि अवघड आहे. यूजरने पोस्टवर कमेंट करून सांगितलं की, त्यांना 1 ते 9 नंबर दिसले. पण त्यांना 5 नंबर दिसला नाही. तर काही लोकांनी 10 नंबर शोधून काढले आहेत. ते म्हणाले की, हे 1,2,3,4,6,7,8,0 आणि 00 म्हणजे इनफिनिटी आहे.