Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जे लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतात. या फोटोंमधून मनोरंजन तर होतच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. कारण या फोटोंमधील गोष्टी शोधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोंमध्ये तुम्हाला ५ फरक शोधायचे आहेत.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक कोल्हा दिसत आहे. कोल्हा हा झुडपामागे लपला असून तो काहीतरी बघून घाबरलेला आहे. त्यामुळे त्याला घामही फुटला आहे. दोन्ही फोटो एकसारखे दिसतात. पण ते एकसारखे नाहीत. त्यात पाच फरक आहेत. तेच तुम्हाला १२ सेकंदात शोधायचे आहे. चला तर मग लागा कामाला...
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यांव्दारे तुमची आयक्यू टेस्टही होते. कारण कधी यात प्राणी, कधी वस्तू, कधी वेगळे नंबर तर कधी फरक शोधायचे असतात. या फोटोंमधील गोष्टी शोधण्यात एक वेगळीच मजाही येते. म्हणून लोक सोशल मीडियावर असे फोटो शेअर करून एकमेकांना चॅलेंजही देत असतात.
जर ठरलेल्या वेळेत म्हणजे १२ सेकंदात तुम्हाला या एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोतील ५ फरक दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. जर अजूनही सापडले नसतील तर निराश होऊ नका. कारण ते काय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही हे ५ फरक बघू शकता.
वरच्या फोटोत ५ फरक सर्कल केले आहेत.