Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मेंदू आणि डोळ्यांची कसरत करण्यासाठी फारच फायदेशीर मानले जातात. कारण यांमध्ये लपलेल्या गोष्टी शोधण्यासाठी डोकंही लावावं लागतं आणि फोटो बारकाईने बघावा लागतो. यात एक वेगळीच गंमत आहे. म्हणूनच असे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला ५ फरक शोधायचे आहेत.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला काही शेलिंग शीप्स समुद्रात दिसत आहेत. दोन फोटो एकसारखे दिसत आहेत. पण ते एकसारखे नाहीत. त्यात ५ फरक आहेत तेच शोधण्याचं तुम्हाला चॅलेंज आहे. जर तुम्ही जीनिअस असाल आणि तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच या फोटोतील ५ फरक ७ सेकंदात शोधू शकाल.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी या फोटोंमध्ये काही वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात. तर कधी या फोटोंमध्ये तुम्हाला फरक किंवा वेगळे नंबर शोधायचे असतात. यांमध्ये गोष्टी इतक्या हुशारीने लपवलेल्या असतात की, त्या शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्ही जर फोटो बारकाईने बघितला तरच तुम्हाला यात यश मिळेल.
जर ठरलेल्या वेळेत म्हणजे ७ सेकंदात तुम्हाला एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत ५ फरक दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. जर अजूनही फरक दिसले नसतील तर दुसऱ्या एखाद्या चॅलेंजमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. या फोटोत ५ फरक कोणते आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ते खालच्या फोटोत तुम्ही बघू शकता.
वरच्या फोटोत ५ फरक सर्कल केलेले आहेत.