Optical Illusion Find A Leopard: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये प्राण्यांना सोधणं किंवा एखादी वस्तू शोधण्याची क्रेझ काही कमी होताना दिसत नाहीये. जसेही लोक ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो बघतात, ते त्यातील प्रश्नांची उत्तर शोधू लागता किंवा त्यातील रहस्य उलगडू लागतात. काही फोटो असे असतात ज्यात प्राणी तुमच्या डोळ्यांसमोरच असतात, पण दिसत नाहीत. सध्या एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे आणि लोक मित्रांना त्यातील बिबट्या शोधण्याचं चॅलेंज देत आहेत.
सध्या व्हायरल झालेला हा फोटो भारतीय वाइल्ड लाइफ फोटोग्राफर हिरा पंजाबीने काढला आहे. त्यांनी हा फोटो काढणं त्यांच्या आतापर्यंत सर्वात भारी अनुभवांपैकी एक असल्याचं सांगितलं आहे. तुम्ही फोटोत बर्फाने झाकलेला एक डोंगर बघू शकता. इथे एक शिकारीही आहे. जो बर्फाळ डोंगरात आपल्या शिकारचा शोध घेत आहे. तुमच्यासाठी चॅलेंज हे आहे की, तुम्हाला यातील बिबट्या 13 सेकंदात शोधायचा आहे. स्नो लेपर्ड हा फारच हुशार असतो, आपल्या शिकारीला दिसू नये म्हणून तो बर्फात लपतो.
या फोटोत तसं बिबट्याला शोधणं फारच अवघड काम आहे. पण तो शोधण्यासाठी तुम्हाला फोटो बारकाईने बघावा लागेल आणि त्यातील बिबट्या शोधावा लागेल. तो डोंगराच्या आसपास लपला आहे, त्यामुळे तो पकटन दिसत नाही. पण ज्यांनी नजर तीक्ष्ण आहे ते नक्कीच यातील बिबट्याला शोधू शकतात. तुम्हाला जर खूप प्रयत्न करूनही यातील बिबट्या दिसला नसेल तर खालच्या फोटोत तुम्ही तो बघू शकता.