Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोकांना नेहमीच भ्रमात टाकतात. हे फोटो लोकांच्या बुद्धीची कसरतही करतात. या फोटोंमध्ये काही लपलेलं शोधायचं असतं तर काही फोटोंमध्ये चुका काढायच्या असतात. जे लोकांना खूप आवडतं. कारण यातून त्यांचं मनोरंजनही चांगलं होतं. असे फोटो आजकाल सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
तुमच्यासमोर एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आहे. या फोटोत तुम्हाला लाइनमध्ये 4 नंबर लिहिलेला दिसत असेल. सुरूवातीला सगळ्यांनाच हे वाटतं की, फोटोत सगळीकडे 4 नंबर आहे. पण प्रत्यक्षात असं नाहीये. 4 नंबरमध्ये एक A अक्षरही लपवलेलं आहे. जे तुम्हाला शोधायचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे.
या फोटोतील 4 नंबरच्या गर्दीतील A अक्षर शोधणं तसं तर सोपं काम नाही. पण जर तुम्ही जीनिअस असाल आणि तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही लगेच शोधू शकाल. बराच वेळ घेऊनही तुम्हाला यातील A सापडला नसेल तर निराश होण्याचीही गरज नाही. आम्ही खालच्या फोटोत उत्तर दिलं आहे.
खालून सहाव्या लाईनमध्ये तुम्हाला A दिसेल.