Optical Illusion Challenge: सोशल मीडियावर वेळ घालवत असताना तुम्हाला इतक्या काही गोष्टी बघायला मिळतात ज्या फारच इंटरेस्टिंग असतात. अनेक क्वीज आणि गेम्सही खेळायला मिळतात. काही फोटोंमध्ये काहीतरी शोधायचं असतं आणि काही फोटोंमधील चुका शोधायच्या असतात. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. अशा फोटोंची आजकाल फारच क्रेझ बघायला मिळते.
अशा फोटोंच्या माध्यमातून तुमचा टाइमपास तर होतोच सोबतच तुमच्या डोळ्यांची टेस्टही आणि आयक्यू लेव्हलची टेस्टही होते. त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असे फोटो सॉल्व करणं आवडतं. आज आम्ही तुमच्यासाठी असाच फोटो घेऊन आलो आहोत. ज्यातील एक वस्तू तुम्हाला शोधायची आहे.
पुस्तकांमध्ये लपवली आहे पेन्सिल
हा फोटो Oxbridge नावाच्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आली आहे. ज्यात तुम्हाला खूपसारी पुस्तक दिसत आहे. पुस्तकं वेगवेगळ्या रंगांची आहेत आणि अशी ठेवण्यात आली आहेत कुणीही बघून कन्फ्यूज होईल. यात एक चॅलेंज आहे. तुम्हाला 9 सेकंदात या पुस्तकांमध्ये लपवलेली पेन्सिल शोधायची आहे. पेन्सिल अशी लपवण्यात आली आहे जी सहजपणे दिसणार नाही.
तशी जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत पेन्सिल दिसली असेल तर खरंच तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत. ज्यांना अजूनही पेन्सिल दिसली नसेल त्यांच्यासाठी एक हिंट आहे. फोटोच्या उजवीकडे जास्त बारकाईने बघा. जर अजूनही पेन्सिल दिसली नसेल तर खालच्या फोटोत ती कुठे आहे हे बघू शकता.