Optical Illusion Woman And Child: सोशल मीडियावर नेहमीच लोकांना भ्रमात टाकणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो तीन प्रकारचे असतात. शाब्दिक, शारीरिक आणि संज्ञानात्मक. या सर्वच इल्यूजनचा एकच उद्देश आहे मानवी मेंदुमध्ये भ्रम तयार करणं.
सोबतच याद्वारे लोकांचं ऑब्जर्वेशन स्किल आणि परसेप्शन लेव्हलचं परीक्षण केलं जातं. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, ऑप्टिकल इल्यूजन मेंदूच्या क्षमता वाढवण्यास मदत करतात. तुमचं ऑब्जर्वेशन स्किलही सुधारतात.
असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये एका डोंगरासारखं दृश्य आहे. सोबतच डोंगराजवळून पाणी वाहत आहे. तुम्हाला या डोंगरात एक महिला आणि एका मुलाला शोधायचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे आहेत केवळ 11 सेकंद.
पण यातील रहस्य शोधण्यासाठी तुमचे डोळे तीक्ष्ण आणि डोकं शांत असणं फार गरजेचं आहे. फोटोत पहिल्या नजरेत तुम्हाला एका डोंगर दिसतो, सोबतच खालून पाणी वाहताना दिसतं. आजूबाजूला काही झाडीही तुम्हाला दिसतील. पण या फोटोत महिला आणि लहान मुलगा शोधण्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असणं फार गरजेचं आहे. या फोटोला एका दृष्टीकोणातून बघण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच तुम्हाला तुमचं उत्तर सापडेल.