Optical Illusion : आजकाल सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंद्वारे मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण केला जातो. जे लोकांना खूप आवडतं. या फोटोंमधील रहस्य उलगडण्यात लोकांना फार मजा येते. कारण याने मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. कधी या फोटोंमध्ये काही चुका शोधायच्या असतात तर कधी यातील लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
तुमच्यासमोर एक ग्राफिक इमेज आहे. ज्यात तुम्हाला काही मुले खेळताना दिसत आहेत. काही सायकल चालवत आहेत. काही लोक झाडाखाली बसून पुस्तकं वाचत आहेत. एक आइसक्रीम स्ट्रोली आहे. पण यात तुम्हाला एक कार शोधायची आहे.या फोटोत असलेली कार तुम्हाला सहजपणे दिसणार नाही. पण जर तुम्ही मेहनत घेतली तर नक्कीच दिसेल. यासाठी तुमच्याकडे वेळही कमी आहे. तुम्हाला या फोटोतील कार केवळ 7 सेकंदात शोधायची आहे. तुमचे डोळे जर तीक्ष्ण असतील तर तुम्हाला लगेच यातील कार दिसेल.
जर तुम्हाला 7 सेकंदात या फोटोतील कार दिसली असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर कार अजूनही दिसली नसेल तर निराश होऊ नका. ती शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. तुम्ही जर आइसक्रीमच्या स्ट्रोलीवर फोकस कराल तर आइसक्रीमच्या गाडी खाली तुम्हाला एक कार दिसेल. ती खेळण्यातील कार आहे.