Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच काही ऑप्टिकल इल्यूजन फोटो किंवा पझल्स व्हायरल होत असतात. जे सॉल्व करणं लोकांना खूप आवडतं. याद्वारे त्यांचं चांगलं मनोरंजनही होतं आणि त्यांच्या डोळे व मेंदुची टेस्टही होते. कारण असे फोटो डोळ्यांसमोर आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात. असाही दावा केला जातो की, याने केवळ आपल्या मेंदुची एक्सरसाइज होते असं नाही तर स्मरणशक्तीही वाढते.
असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला समुद्रातील अनेक जीव दिसत आहेत. यात भरपूर शिंपले आहेत. पण त्यांच्यात एक खेकडाही लपला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे.
या फोटोत तुम्हाला अनेक शिंपले दिसत आहेत. पण त्यात एक खेकडा लपला आहे. ज्याला तुम्हाला शोधायचं असून त्यासाठी तुमच्याकडे केवळ 25 सेकंदाची वेळ आहे. हा खेकडा शोधण्यासाठी तुमच्याकडे फार बारीक नजर हवी तरच तुम्ही त्याला शोधू शकता. पण हे काही सोपं काम नाही.
सामान्यपणे खेकड्यांचे पाय किंवा नांग्या त्यांची मुख्य ओळख असतात. प फोटोत त्याला शोधणं फारच अवघड काम आहे. कारण त्याला असं लपवण्यात आलं आहे की, तो सहज दिसणार नाही. खेकड्याला जेव्हाही काही धोका जाणवतो तेव्हा तो अलर्ट राहतो. पण या फोटोत एक सन्यासी खेकडा लपला आहे. जे फार शांत दिसतात आणि त्यांचे पंजे रूंद असतात. ते स्वत:चा बचाव करण्यासाठी शिंपल्यांमध्ये लपतात. असाच हा आहे. बरेच लोक या खेकड्याला शोधून शोधून थकले. पण त्यांनाही काही खेकडा दिसला नाही. अशात तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करू शकता. जर तुम्हाला खेकडा दिसला नसेल तर खालच्या फोटोत तुम्ही त्याला बघू शकता.