Optical Illusion : आजकालच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या प्रेशरमुळे लोक अनेकदा मानसिक तणावाचे शिकार होतात. अशात डोकं शांत करण्यासाठी वेगवेगळ्या अॅक्टिविटींचा आधार ते घेतात. याने मेंदू शार्पही होतो आणि अॅक्टिवही राहतो.
ऑप्टिकल इल्यूजन याच माइंड अॅक्टिविटीचा एक भाग आहे. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत असतात. हे इतके मजेदार आणि चॅलेंजिंग असतात की, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
काही फोटोंमध्ये तुम्हाला काहीतरी शोधायचं असं तर काही फोटोंमध्ये तुम्हाला काही चुका शोधायच्या असतात. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक मांजर दिसत आहे. ती फारच कन्फ्यूज दिसत आहे. कारण तिला भूक लागली आहे. तिच्या आजूबाजूला एक मासा आहे. जो तिला दिसत नाहीये. हा मासाच तुम्हाला शोधायचा आहे. तसंच हे चॅलेंज काही सोपं नाही. पण तुम्ही बारकाईने बघाल आणि डोकं शांत ठेवू बघाल तर नक्कीच यातील मासा तुम्हाला दिसेल. महत्वाची बाब म्हणजे यातील मासा शोधण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे.
आशा आहे की, 10 सेकंदात तुम्हाला यातील मासा दिसला असेल. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करतो. या फोटोत तुम्हाला एक काचेचा पॉटही पडलेला दिसत असेल. जर त्याकडे बारकाईने बघाल तर तुम्हाला त्यावरील मास्याचं चित्र दिसेल. खालच्या फोटोत याचं उत्तर तुम्ही बघू शकता.