Optical Illusion Find The Goat: ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपला मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे त्यात जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते लगेच दिसत नाही. हे फोटो आपली फोकस करण्याची क्षमता वाढवू शकतात. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तुम्हाला एक बकरी शोधायची आहे. जी कुणालाही सहजपणे दिसत नाहीये. महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला ही बकरी केवळ 10 सेकंदात शोधायची आहे. त्यामुळे यात तुमचा चांगलाच कस लागणार आहे.
जेव्हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो समोर येतो तेव्हा मेंदू कन्फ्यूज होतो. आपल्या फोटोचं सत्य माहीत नसतं. या फोटोत तुम्हाला काही मोठाले दगड आणि डोंगर दिसत आहे. यात एक बकरी लपली आहे. पण तिला शोधणं इतकंही सोपं काम नाही. बकरीचा रंग आजूबाजूच्या दगड आणि मातीच्या रंगासोबत मिक्स झाला आहे. अशात 10 सेकंदात बकरी शोधणं फार आव्हानात्मक ठरतं.
तुम्हाला जर या फोटोतील बकरी शोधायची असेल तर फोटोचा कोपरांकोपरा बारकाईने बघावा लागेल. तसेच तुम्हाला हे करत असताना तर्कबुद्धीचाही वापर करावा लागेल. जर तुम्हाला यातील बकरी सापडली असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर तुम्हाला अजूनही बकरी दिसली नसेल तर निराश होऊ नका. आम्ही ती शोधण्यात तुमची मदत करतो. खाली एक फोटो देण्यात आला आहे ज्यात या फोटोतील बकरीला राउंड केलं आहे.