Hidden Snow Leopard: ऑप्टिकल इल्यूजन फोटो फारच मजेदार असतात, कारण ते तुमच्या मेंदूला भ्रमात टाकतात. अनेक लोकांना माध्यमातून मेंदूची टेस्ट करणं आवडतं. बरेच लोक यातील रहस्य शोधण्यासाठी बराच वेळ देतात. पण काही जीनिअस लोक यातील रहस्य कमीत कमी वेळेत शोधतात. या ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील रहस्य उलगडण्यासाठीही तुमच्याकडे 20 सेकंदाचा वेळ आहे.
या फोटोत एक स्नो लेपर्ड लपला आहे जो तुम्हाला शोधून काढायचा आहे. पण हे काही सोपं काम नाही. मात्र, तुम्ही तुमच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर जोर दिला तर तुम्ही यातील लेपर्ड म्हणजे बिबट्या शोधू शकता. या फोटोत बिबट्या असा मिक्स झाला आहे की, डोंगर आणि आजूबाजूच्या दगडांचा रंगही तसाच दिसत आहे. त्यामुळे बिबट्याला शोधणं सोपं काम नाही.
जर तुम्ही 20 सेकंदात यातील बिबट्या शोधला तर खरंच तुमचे डोळे आणि तुमचा मेंदू खूप शार्प आहे असं समजा. जर तुम्हाला बिबट्या दिसला नसेल तर पुन्हा एकदा शोधण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. बिबट्या फोटोच्या मधोमध आहे.
सोशल मीडिया हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. अशाप्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करण्यात खूप मजा येते. कारण यातील रहस्य शोधल्यावर तुमचा आत्मविश्वासही वाढतो आणि तुमची नजर किती तीक्ष्ण आहे हेही समजतं.