How Many Animals in The Photo: सध्या सोशल मीडियावर एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्यूजनची खासियत ही असते की, हे फोटो किंवा व्हिडीओ आपल्या मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. हे बघितल्यावर समजतं जे दिसतं तसं नसतं. या फोटोत तुम्हाला किती प्राणी दिसतात हे सांगायचं आहे.
हा एक असा फोटो आहे ज्यात तुम्हाला एक अस्वल दिसत आहे. पण त्याच्यामागे किती प्राणी आहेत हे शोधणं अवघड काम आहे. ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो डोकं चक्रावून सोडणारा आहे. इतकंच नाही तर ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो वैज्ञानिकांना हे समजून घेण्यास मदत करतात की, त्या त्या फोटोबाबत बोलताना आपला मेंदू कसा काम करतो.
या फोटोत मजेदार बाब ही आहे की, हा फोटो जवळपास ब्लॅक अॅन्ड व्हाइट दिसत आहे. फोटोत सगळे प्राणी सहज दिसत नाहीत. फोटोत दिसत आहे की, अस्वलाच्या मागे अनेक छोटे प्राणी आहेत. पण किती आहेत याचा अंदाज लगेच येत नाही.
काय आहे बरोबर उत्तर
मुळात या फोटोत सहा प्राणी आहे. यात अस्वल, श्वान, मांजर, वटवाघूळ, माकड आणि खारूताई आहे. यात अस्वल सगळ्यात पुढे उभा आहे. तर त्याच्या मागे इतर प्राणी आहेत. फोटो असा सेट करण्यात आला आहे जेणेकरून सगळे प्राणी दिसू नये.