Optical Illusion Challenge: जेव्हा लोक ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो बघतात तेव्हा त्यांना त्यातील रहस्य शोधण्यासाठी वेळ तर लागतोच. कारण त्यात बारकाईने बघावं लागतं. त्यातील रहस्य उलगडल्यानंतर किंवा त्यातील प्राणी किंवा वस्तू शोधल्यानंतर लोकांना रिलॅक्स वाटतं. या फोटोंमुळे लोकांचं मनोरंजनही होतं आणि दृष्टी किती चांगली आहे टेस्ट करता येतं. सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत तुम्हाला एक बिबट्या शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काहींमध्ये तुम्हाला जे असतं ते दिसत नाही तर काहींमध्ये तुम्हाला प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात. पण यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला फार बारकाईने आणि डोकं शांत ठेवून हे चॅलेंज पूर्ण करायचं असतं. आता या फोटोत एक दगडाचा डोंगर दिसत आहेत. ज्यात एक बिबट्या लपलेला आहे. तो तुम्हाला शोधायचा आहे.
या फोटोत बिबट्या दगडावर बसलेला आहे. तो तुम्हाला 13 संकेदात शोधायचा आहे. जर तुम्हाला बराच वेळ शोधूनही यातील बिबट्या दिसला नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोत डावीकडे बिबट्या बसला आहे. आता तुम्हाला त्याला शोधणं सोपं जाईल. पण अजूनही तुम्हाला तो दिसला नसेल तर खालच्या फोटोत याचं उत्तर आहे.