Optical Illusion : सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. ज्यातील रहस्य, लपलेल्या गोष्टी शोधणं लोकांना फार आवडतं. लोक असे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात आणि आपल्या मित्रांना चॅलेंज देतात. महत्वाची बाब म्हणजे या फोटोंमधून केवळ तुमचं मनोरंजन होतं असं नाही तर त्यातून तुमच्या मेंदुल चालना मिळते आणि डोळ्यांचीही टेस्ट होते. मेंदुची कसरत होत असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे फोटो आवडतात.
असाच एक व्हायरल झालेला फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा फोटो एका अॅक्वेरिअमचा आहे. ज्यात तुम्हाला S हे लपवलेलं अक्षर शोधायचं आहे. हे अक्षर तुम्हाला केवळ 10 सेकंदात शोधायचं आहे. भ्रम निर्माण करणारा हा फोटो Behance.net वर पब्लिश करण्यात आला आहे. हा फोटो अमेरिकन आर्टिस्ट ‘चक डिलन’ ने तयार केला आहे. जर ठरलेल्या वेळेत तुम्ही S अक्षर शोधला तर तुम्ही जीनिअस ठराल.
हा फोटो एका अॅक्वेरिअममधील आहे. ज्यात बरीच मुलं फिरताना दिसत आहेत. फोटो जेव्हा बारकाईने बघाल तेव्हा तुम्हाला फरशीवरील चित्र, समुद्रातील जीव दिसतील. त्यात किटक, मासे, शार्क आणि इतरही जीव दिसतील.
मुलांमध्ये एक डॉगीही आहे. हे सगळे इथे रंगीबेरंगी डब्यांसोबत बसले आहेत. मुले पेटींग करत आहेत. अशात या सगळ्यात तुम्हाला अक्षर ‘S’ शोधायचा आहे. यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाचा वेळ आहे. तरच यात मजा येईल.
हा फोटो तुम्हाला खूप जास्त कन्फ्यूज करेल कारण यात अनेक गोष्टी दिसत आहेत. त्यामुळे यातील ‘S’ हे अक्षर शोधणं फारच अवघड काम आहे. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. शार्प मेंदु आणि तीक्ष्ण डोळे असेल तरच तुम्ही ते शोधू शकाल. हे अक्षर शोधणं अशक्य नाही, पण अवघड नक्कीच आहे. जर तुम्हाला अजूनही हे अक्षर दिसलं नसेल तर खालच्या फोटोत बघू शकता.