Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन ज्यामुळे भ्रम तयार होतो. असे ऑप्टिकल इल्यूजनचे कितीतरी फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे फोटो पाहून लोक हैराण होतात. या फोटोंमुळे लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण होते. यामुळे लोकांचं चांगलं मनोरंजनही होतं आणि त्यांची डोळ्यांची टेस्टही होते. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्हाला एक मांजर शोधायची आहे.
या ऑप्टिकल इल्यूजन फोटोत तुम्हाला एका मोठं कपाट दिसत आहे. ज्यात एक मांजर लपली आहे. हीच मांजर तुम्हाला शोधायची आहे. असा दावा करण्यात आला आहे की, केवळ 2 टक्के लोकच यातील मांजर शोधू शकले आहेत. हा ऑप्टिकल इल्यूजन आयक्यू टेस्ट करण्याची एक मजेदार पद्धत आहे.
तुम्हाला अजूनही या फोटोत लपलेली मांजर दिसली नसेल तर आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोत. या कपाटात तुम्हाला लटकलेले कपडे दिसतील. कपाटाच्या आत हॅंडबॅग, टोपी, शूज आणि सुटकेस दिसत असेल. हे ऑप्टिकल इल्यूजन तुमची नजर किती तीक्ष्ण आहे दाखवेल. अनेक प्रयत्न करूनही तुम्हाला यातील मांजर दिसली नसेल तर खालच्या फोटोत याचं उत्तर आहे.