Optical Illusion : मेंदुची आणि डोळ्यांची कसरत करायची असेल तर ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करणं एक चांगली पद्धत आहे. अनेक एक्सपर्ट हे फोटो बघण्यास आणि त्यातील गोष्टी शोधण्याचा सल्ला देत असतात. असे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोक असे फोटो शेअर करून त्यातील गोष्टी शोधण्याचं चॅलेंज एकमेकांना देतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक बेडूक शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो मेंदुची कसरत करण्यासोबतच तुमची आयक्यू लेव्हल टेस्ट करण्यासाठीही फेमस असतात. कारण हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. यातील गोष्टी शोधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कधी यात काही गोष्टी शोधायच्या असतात तर कधी या फोटोंमधील फरक शोधायचा असतो. तर कधी वेगळे नंबर शोधायचे असतात. आता तुमच्या समोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक बेडूक शोधायचं आहे. तेही १० सेकंदात.
या फोटोत तुम्हाला काही एका डबक्यात काही पानं दिसत आहेत. यात एक बेडूक लपून बसलं आहे. महत्वाचं बाब म्हणजे आतापर्यंत अनेक लोक यातील बेडूक शोधण्यात फेल झाले आहेत. तुम्हाला जर वाटत असेल की, तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत तर तुम्ही नक्कीच यातील बेडूक शोधू शकाल. पण हे वाटतं तेवढं सोपंही काम नाही. तुम्हाला खूप मेहनत घ्यावा लागणार आहे.
जर तुम्हाला १० सेकंदात या फोटोतील बेडूक दिसलं असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील बेडूक दिसलं नसेल तर निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही ते सर्कलमध्ये बघू शकता.