Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कारण या फोटोंमधील पझल्स किंवा प्रश्न सॉल्व करणं सगळ्यांनाच आवडतात. हे फोटो लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतात. कारण या फोटोंमधून चांगलं मनोरंजन होतं. सोबतच मेंदुची चांगली कसरतही होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक कॅमेरा शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. ज्यात तुम्हाला जे असतं ते सहजपणे दिसत नाही. ते शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. ज्यात एक वेगळी मजा येते. कारण हा एक गेम असतो. यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला मेंदुचा फार वापर करावा लागतो आणि डोळेही तीक्ष्ण असावे लागतात. जर तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच या फोटोतील कॅमेरा शोधून दाखवाल.
या फोटोत तुम्हाला एक कपाट दिसत आहे. ज्यात खूपसारे कपडे आणि काही वस्तू ठेवल्या आहेत. यात एक कॅमेराही लपवण्यात आला आहे. अशा फोटोंमध्ये गोष्टी इतक्या हुशारीने लपवलेल्या असता की, जेणेकरून तुमच्या मेंदुला जास्त चालना मिळावी. तेच या फोटोबाबत आहे. यात कॅमेरा शोधण्यासाठी तुमच्या १० सेकंदाची वेळ आहे.
जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर १० सेकंदात तुम्हाला यातील लपवलेला कॅमेरा दिसला असेल अशी आम्हाला आशा आहे. पण जर अजूनही यातील कॅमेरा तुम्हाला दिसला नसेल तर निराश होण्याचीही गरज नाही. कारण तो कुठे आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही यातील कॅमेरा बघू शकता.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे तुमच्या मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरत करतात. सोबतच तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही समजतो.