Optical Illusion Find A Cat: ऑप्टिकल इल्यूजनमधील गुपित शोधणं हे प्रत्येकाला जमेलच असं नाही. जेव्हा अशा फोटोंकडे बारकाईने पाहिलं जातं तेव्हा डोकं चक्रावून जातं. तासंतास त्यातील गुपित लोकांना कळत नाही. जर तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असेल तरच तुम्ही हे सॉल्व करू शकता. तसेच ऑप्टिकल इल्यूजन ऑब्जर्वेशन स्किल टेस्ट करण्याची एक चांगली पद्धतही आहे. ऑप्टिकल इल्यूजनमुळे लोकांचं मनोरंजनही होतं. तुम्हाला तुमचं ऑब्जर्वेशन स्किल टेस्ट करायची असेल तर आम्ही एक फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला एक मांजर शोधायची आहे.
या फोटोमध्ये तुम्हाला एक स्टोररूम दिसत आहे. ज्यात जुने कॉम्प्युटर, त्यांचे वेगवेगळे पार्टस ठेवले आहेत. यात मदरबोर्ड, कनेक्टर केबल आणि लॅपटॉपसारख्या वस्तूही आहेत. स्टोररूममध्ये खूप धुळही आहे. या सगळ्यांमध्ये एक मांजर लपली आहे. जी तुम्हाला शोधायची आहे तेही फक्त 15 सेकंदामध्ये.
या जुन्या वस्तूंच्या कबडाखान्यात मांजरीला शोधणं काही खायचं काम नाही. कारण मांजरीला शोधण्यासाठी तुमचं डोकं शांत आणि नजर तीक्ष्ण असली पाहिजे. तुम्हाला अजूनही मांजर दिसली नसेल तर तिला तुम्ही तारांमध्ये शोधलं पाहिजे. यासाठी तुमच्याकडे केवळ 15 सेकंद वेळ आहे. जर तुम्ही मांजरीला शोधलं असेल तर खरंच तुमची नजर फार चांगली आहे. पण मांजरीला शोधण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. जर अजूनही सापडली नसेल तर खालच्या फोटोत ती दिसेल.