Optical Illusion : भ्रम निर्माण करणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मनोरंजनात्मक तर असतातच सोबतच या फोटोंच्या माध्यमातून डोळे आणि मेंदुची चांगली कसरतही होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी डोळे आणि मेंदू दोन्ही गोष्टींना मेहनत करावी लागते. या फोटोंमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधाव्या लागतात. ज्यातून तुमचं मनोरंजनही होतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एका इंग्रजी शब्दाचं अचूक स्पेलिंग शोधायचं आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यांमध्ये तुम्हाला कधी प्राणी किंवा वस्तू, तर कधी चुका किंवा फरक तर कधी वेगळे नंबर किंवा शब्द शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. यात तुम्हाला सगळीकडे Consumar असा शब्द दिसत आहे. पण या शब्दाचं हे चुकीचं स्पेलिंग आहे. बरोबर स्पेलिंग शोधण्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मनोरंजनासोबतच तुमची आयक्यू टेस्टही करतात. त्यामुळेच लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही असे फोटो सॉल्व करणं आवडतं. लोक असे फोटो सोशल मीडियावर एकमेकांना शेअर करून चॅलेंजही देतात. या फोटोंमध्ये गोष्टी इतक्या हुशारीने लपवलेले असतात की, त्या शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर हे चॅलेंज नक्कीच पूर्ण करू शकाल.
जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत म्हणजे १० सेकंदात यातील बरोबर स्पेलिंग दिसलं असेल तर तुमचं अभिनंदन. जर अजूनही तुम्हाला यातील बरोबर स्पेलिंग दिसलं नसेल तर निराश होण्याची गरज नाही. कारण ते काय आणि कुठे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही बघू शकता.
Consumar चं बरोबर स्पेलिंग वरच्या फोटोत सर्कल केलं आहे.