Optical Illusion : वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे फोटो तुमचं मनोरंजन करण्यासोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही करतात. त्यामुळे असे फोटो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. ज्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची क्रेझ वाढण्याचं कारण म्हणजे हे फोटो लोकांसमोर चॅलेंज निर्माण करतात. कारण यातील गोष्टी शोधणं काही खायचं काम नसतं. त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे हवेत. जर ते तुमच्याकडे असतील तुम्हाला नक्कीच यश मिळतं. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे R हे अक्षर दिसत आहे. ज्यात तुम्हाला P हे अक्षर शोधायचं आहे. ज्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे.
जसे की, आधी सांगितले ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये तुम्हाला प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात तर कधी यांमध्ये तुम्हाला फरक किंवा वेगळे नंबर शोधायचे असतात. या फोटोत तुम्हाला एक वेगळं अक्षर शोधायचं आहे. जे काही सोपं काम नाही. पण मेहनत केली तर लगेच यश मिळेल.
जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत म्हणजे १० सेकंदात या फोटोतील वेगळं अक्षर दिसलं असेल तर तुमचं अभिनंदन. मात्र, अजूनही दिसलं नसेल तर निराशही होऊ नका. कारण ते कुठं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही ते बघू शकता.
वरच्या फोटोत वेगळं अक्षर सर्कल केलं आहे.